आपल्याकडे जावयाचे 4 प्रकार पडतात..!!
१) साखऱ्या जावई :
साधारण २ टक्के जावई या प्रकारात मोडतात.
हे जावई १०० किलोमीटरपेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात.
त्या मुळे हे वर्ष दोन वर्षातून सासरवाडीला जातात. म्हणून या जावयांना खाण्यासाठी गोड- धोड पदार्थ तसेच कपडे-लत्ते देवून यांचा मानपान होतो.
म्हणून हा साखऱ्या जावई...!!
जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे...!!
२) भाकऱ्या जावई :
या प्रकारात ९५ टक्के जावई मोडतात. हे जावई सासरवाडी पासून १०० किलोमीटरच्या आत राहतात, तर काही एकाच शहरात राहतात.
हे सासरवाडीला वरचेवर जात असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई वडिलांची आठवण आली तर तिच्या सोबत जावे लागते. याचे जाणे नेहमीचे असते त्या मुले या जावयाला खाण्यासाठी जे घरात केले तेच वाढले जाते, तर कधी-कधी फक्त चहा वर भागविले जाते..!!
हा नेहमीचाच म्हणून काही खास मानपान नसतो, म्हणून हा भाकऱ्या जावई..!!
३) ढोकऱ्या जावई :
ह्या प्रकारात २ टक्के जावई सापडतात. हे घरजावई असतात. या जावयाला घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दुध असे आणून द्यावा लागतो.
यांना कधी कधी घर देखील झाडावे लागते.
हा घरातलाच म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस अपमान नक्की. म्हणून हा ढोकऱ्या जावई..!!
4) दयावान जावाई
हा जावाई सासरच्या लोकांना कायम मदत करतो बायकोच ऐकतो त्याला सासरचे मंडळी त्याला कायम सासरच्या मंडळानी गोड गोड बोलुन लुटतात हा 1/2 वर्षेतुन सासरी येतो त्यावेळी त्याचे कडे येटाळ्यातील लोक दयेने बघतात
आता तुम्हीच बघा तुमच्या घरात तुम्ही कोणते जावई ते...??
0 Comments