daily life moment image
google search image

          भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला. अखंड हिंदुस्तानची फाळणी झाली आणि पाकिस्तान व भारत दोन देश तयार झाले. संपूर्ण हिंदुस्तानात राजे रजवाडे.. संस्थाने होती.इंग्रजांच्या कडून देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे पण या राजांना स्वतंत्र राहायचे का भारत किंवा पाकिस्तानात विलिन व्हायचे याचे अधिकार त्या त्या राजांना दिले गेले. 
          बरेच राजे भारतात विलिन झाले तर काही मुस्लिम राजे पाकिस्तानात विलिन झाले..जम्मू आणि काश्मीरचे राजा हरि सिंह नी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेने पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरवर हल्ला केला. 
          स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्याकडे राजा हरि सिंह यांनी मदत मागितली. शिवाय भारतात विलिन होण्याची तयारी दर्शवली. जम्मू काश्मीरचा भाग पाकिस्तानला लागून असल्याने तेथिल लोकांची नातीगोती.. अनेक व्यवहार.. देवाणघेवाण असायची. जम्मूच्या राजाने भारतात विलिन होताना ज्या अटी घातल्या होत्या त्याचा परिणाम म्हणून ३७० कलम जन्माला आले. 
          या कलमास डॉ बाबासाहेब आंबेडकर व सरदार वल्लभभाई पटेल यांचा विरोध होता. तरीसुध्दा काश्मीर भारताला जोडणे महत्वाचे असल्याने पंडीतजीने हे कलम तात्काळ मान्य केले आणि जम्मूच्या राजाला मदत केली. पकिस्तानचा हल्ला परतवून लावला.. पण भौगोलिक प्रतिकूल परिस्थिती असलेने काश्मीरच्या संपूर्ण भागावर भारतीय सैन्याना ताबा घेता आला नाही.
          आज तो पाकव्याप्त काश्मीर आहे...पंडीतजीनी ३७० कलम लागू करून जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला असला तरी हे कलम लवकरात लवकर संपुष्टात येईल असे त्यांना वाटत होते.पण जातीय राजकारणामुळे हे कलम रद्द होवू शकले नाही. 

*३७० कलमातील ठळक तरतुदी..*

१) या कलमानुसार जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळतो.
२) जम्मू काश्मीर मध्ये आपण(भारतीय) जमिन किंवा घरदार खरेदी करू शकत नाही.
३) भारतातील कायदे जम्मू काश्मीरच्या विधीमंडळाच्या परवानगी शिवाय लागू होत नाहीत.
४) येथील लोकांना दुहेरी नागरीकत्व आहे.
५) येथील मुलगीचा विवाह भारतात इतर कोणत्याही राज्यात झाल्यास तिचे जम्मू काश्मीर चे नागरीकत्व संपते         पण तिचा विवाह पाकिस्तानच्या नागरीकाशी झाल्यास त्या पाकिस्तानी नागरीकास जम्मू काश्मीरचे                   नागरीकत्व मिळते. 
६) जम्मू काश्मीरचा राष्ट्रध्वज वेगळा आहे.
७) येथील विधानसभेचा कार्यकाल ६वर्षाचा आहे.
८) RTE व RTI सारखे कायदे येथे लागू नाहीत.
९) अलीकडील काळात संसदेवर जम्मू काश्मीर चे खासदार प्रतिनिधित्व करू लागले आहेत अन्यथा ते ही              नव्हते.

अशाप्रकारच्या अनेक घातक अटीसह जम्मू काश्मीर भारतात सामावून घेण्यात आले होते. 
daily life moment image


*सदर ३७० कलम रद्द करता येते का?*
हो .. हे कलम रद्द करता येते.
३७० हे कलम संविधान सभा किंवा राष्ट्रपती रद्द करू शकतात. 
संविधान सभा आता अस्ति
त्वात नसलेने राष्ट्रपती हे कलम रद्द करू शकतात..
३७० हे कलम जर अजून काही वर्षे राहीले तर जम्मू काश्मीर मध्ये पाकिस्तानी लोकांची संख्या झपाट्याने वाढेल... 
ही चिंतेची बाब आहे. 
*तेंव्हा ३७० हे कलम रद्द करण्यासाठी सरकारकडे तमाम भारतीयांनी आग्रह धरला पाहीजे..*.... 

भारत माता की जय!

वंदेमातरम्